Marathi Manus Pantpradhan kadhi Banel?
Thinkbank
Narrador Vinayak Pachlag
Editorial: Storyside IN
Sinopsis
गेल्या ६० वर्षाचा महाराष्ट्राचा प्रवास कसा होता? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलं त्यात आता आपण कुठेतरीकमी पडतोय का? गेल्या वर्षांमध्ये राजकीय स्वार्थासाठी जातीभेद निर्माण केला गेला का? महाराष्ट्राचे राजकारण हे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राजकारणापेक्षा हा वागले कसे राहिले? एक राज्य घडवण्यात प्रशासनाचा नक्की वाटा काय असतो? मुंबई, पुणे यांसारखी काही शहरे सोडून बाकी शहरांचा विकास का झाला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्याही मागे जातो? उद्योग महाराष्ट्राबाहेर जातायत का? शासकीय धोरणांमुळे पुणे हे भारताची सिलिकॉन व्हॅली होता होता राहिला का? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासाकडे कसे बघता? सामाजिक फाटाफुटीमुळे महाराष्ट्राची गती थांबली का? यशवंतराव चव्हाणांना जे जमलं ते शरद पवार यांना जमलं नाही का? जात पात धर्म सोडून एखाद्या व्यक्तीला भारताच्या नेतृत्वासाठी पाठिंबा देणं हे महाराष्ट्राला जमेल का? महाराष्ट्र @६० या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची घेतलेली मुलाखत.
Duración: alrededor de 1 hora (00:47:45) Fecha de publicación: 04/07/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —