Chitrakatha
Sayali Kedar
Narrador Swapnali Patil, Siddharth Chandekar
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
ही गोष्ट जयदीप आणि गौतमीच्या अर्धवट राहिलेल्या नात्याची आहे. एका कॉलेजमध्ये शिकत असताना एकमेकांचा सहवास अनुभवताना काही feelings जाणवली पण सांगायची राहून गेली. कधीतरी express करायचा chance होता पण सोडून दिला गेला. कधीतरी stand घ्यायची गरज होती पण घेतला नाही गेला. झालं ते झालं. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून तो अजून single आणि ती सुद्धा. बरं आता वय असं झालंय की समोरचा single नसेलंच, त्याला कोणीतरी मिळालं असेलंच अशी खात्री आहे. आणि या खात्रीमुळेच आपलं single असणं सांगायची सुद्धा लाज वाटतीये. १२ वर्षांनंतर असेच जयदीप आणि गौतमी एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना कडकडून मिठी मारुन I love you म्हणून लगेच एकत्र राहायला लागलाचंय. पण समोर आल्यावर साधं hi म्हणताना ही तारांबळ होतीये. कॉलेजमध्ये असताना समज नव्हती, Decision making power नव्हती, गोष्टींचा seriousness नव्हता. पण आज १२ वर्षांनी आलेली extra समज, अति विचार करण्याची क्षमता आणि एका नकार पचवायची भीतीमुळे परत दोघं त्याच चुका करतील का?
Duración: alrededor de 1 hora (01:10:41) Fecha de publicación: 08/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —