Vidyarthi Netyancha Dushkal Ka?
Pratik Koske
Narrateur Sunil Patil
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
२०११ साली भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत 'मी अण्णा' लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलनात उतरलेले जंतरमंतरवर ठाण मांडून बसलेले हजारो तरुण आठवतायत? निर्भया बलात्कारानंतर देशभर काढण्यात आलेले मेणबत्ती मोर्चे, किंवा कन्हैय्या कुमारच्या अटकेनंतर पसरलेला असंतोष आठवून पाहा. तरुणांच्या आंदोलनांची सुरुवात नेहमीच खणखणीत होते. पण जेवढ्या वेगाने हे वणवे पसरतात, तेवढ्याच वेगाने विझूनही जातात. त्यामुळे विद्यार्थी आंदोलने, चळवळी तेवढ्या काळापूरत्या चर्चेत येत असल्या, तरी त्यातून लांब पल्ल्याचं नेतृत्त्व तयार होत नाही. एकेकाळी भारतात विद्यार्थी चळवळ हा देशाच्या राजकारणात एन्ट्री करण्याचा मार्ग होता, पण आता तिथून मोठं नेतृत्त्व समोर येताना दिसत नाही. हे असं का झालं? विद्यार्थी चळवळी कमी का झाल्या, आणि त्यांच्यातून राजकीय नेतृत्त्व तयार होणं बंद का झालं, हे आज आपण समजून घेणार आहोत.
Durée: 16 minutes (00:16:23) Date de publication: 15/03/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —